खोकल्यामुळे मुंबईकर हैराण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2018

खोकल्यामुळे मुंबईकर हैराण

मुंबई - कडक उन्हामुळे आणि घामांच्या धारांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना येणाऱ्या व्हायरल तापात वाढ झाली आहे. आता त्यात कोरड्या खोकल्याची भर पडली आहे. विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी पोषक ठरलेल्या या वातावरणामध्ये कोरडा खोकला, घसा खवखवणे, घसादुखी यांसारख्या त्रासामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये खोकला थांबत नसल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्णांना कोरडा खोकला येत असून हा खोकला थांबत नाही, किंवा काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्यानंतर खोकल्याचा त्रास वाढत असल्याचे दिसून येत आहे सार्वजनिक रुग्णालयामध्ये रोज अशा तक्रारी घेऊन सुमारे ४० ते ५० रुग्ण येतात.

Post Bottom Ad