मुंबई - गेल्या चार वर्षांत लोकसभा व राज्यसभेतील खासदारांचे वेतन व भत्त्यांवर तब्बल १९९७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. खर्चाचा आढावा घेतल्यास लोकसभेच्या प्रत्येक खासदारावर ७१ लाख रुपये तर राज्यसभेच्या खासदारांवर प्रत्येकी ४४ लाख रुपये खर्च झाले आहेत. खासदारांवरील खर्चाचा हा आकडा सर्वांसाठीच धक्कादायक ठरला आहे.
मध्य प्रदेश येथील इंदूरच्या चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात लोकसभेकडून माहिती अधिकारात हि माहिती मिळविली आहे. लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत निर्वाचित ५४३ खासदार असून, दोन खासदारांची अँग्लो इंडियन समाजातून नियुक्ती होते. तर राज्यसभेत २४५ खासदार आहेत. गेल्या चार वर्षांत लोकसभा खासदारांवर राज्यसभा खासदारांच्या तुलनेत अधिक खर्च झाला आहे. सन २०१४-१५ पासून गेल्या चार वर्षांत लोकसभा खासदारांना १५५४ कोटी रु. वेतन व भत्ते स्वरूपात मिळाले आहेत. प्रत्येक खासदारावरील खर्च पाहता तो ७१ लाख २९ हजार ३९० रु. होतो. याप्रमाणेच राज्यसभेच्या खासदारांवर याच चार वर्षांच्या काळात ४४३ कोटी रु. खर्च करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराला गेल्या चार वर्षांत दरवर्षी ४४ लाख ३३ हजार ६८२ रु. मिळाले आहेत.
लोकसभा
५४५ खासदार, एकूण खर्च - १५५४ कोटी रु.
राज्यसभा
२४५ खासदार., एकूण खर्च - ४४३ कोटी रु.
लोकसभा
५४५ खासदार, एकूण खर्च - १५५४ कोटी रु.
राज्यसभा
२४५ खासदार., एकूण खर्च - ४४३ कोटी रु.