दिवा / आरती मुळीक परब -
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. विशेष करून ही गर्दी कोकण रेल्वेवर पाहायला मिळते. प्रवाशांची गर्दी असली तरी या गाडयांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला नव्हता. गणपती स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा न दिल्याच्या निषेधार्थ शनिवार ८ सप्टेंबर रोजी दिवा स्थानकातुन रेल्वे प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास सुरू केला. याची दखल घेत मध्य रेल्वेने तीन रेल्वे गाडयांना दिवा स्थानकात थांबा जाहीर केला.
कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा याकरिता दिवा रेल्वे प्रवासी संघटना गेली अनेक वर्षे रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत होती. मागील दोन वर्षांपासून एका नाममात्र स्पेशल गाडीला दिवा स्थानकात थांबा दिला जात होता. कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांपैकी खालील गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा असे पत्र दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले होते. परंतु सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून दिवेकर रेल्वे प्रवासी शनिवार दिनांक ०८/०९/२०१८ रोजी सकाळी दिवा स्थानकातून काळ्या फिती लावून प्रवास करतील असे पत्र नुकतेच प्रवासी संघटनेतर्फे देण्यात आले होते. त्या निषेध आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आज सकाळी काही नवीन गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेऊन त्या गाड्या थांबल्याही.
या गाड्या दिव्यात थांबणार -
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई- रत्नागिरी (०१०३३)
२) लोकमान्य टिळक टर्मिनन्स- झारप (०१०३९/०१०४०)
३) सावंतवाडी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई(०१०३६)
१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई- रत्नागिरी (०१०३३)
२) लोकमान्य टिळक टर्मिनन्स- झारप (०१०३९/०१०४०)
३) सावंतवाडी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई(०१०३६)