तरुणाचा महिला प्रवाशासमोर किळसवाणा प्रकार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2018

तरुणाचा महिला प्रवाशासमोर किळसवाणा प्रकार

मुंबई - लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हार्बर मार्गावर महिलांच्या डब्यात घुसलेल्या तरुणाने डब्यातील महिला प्रवाशासमोर किळसवाणा प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी महिलेने तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. 

हार्बर मार्गावरील सीएसटीएम ते पनवेल लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या डोळ्यासमक्ष सर्व प्रकार घडला. पनवेल लोकल सीएसटीएम स्थानकातून बाहेर पडताच फर्स्ट क्लासच्या डब्यातून एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. त्या प्रवाशाने महिला डब्यातील जाळीतून बघितले असता एका महिलेशेजारी तरुण बसलेला दिसून आला. तरुण माझ्यासमोर विकृत चाळे करत आहे,' असे त्या महिलेने प्रवाशाला सांगितले. प्रवाशांच्या आरडाओरडामुळे त्या तरुणाने पँटची चेन बंद केली आणि रेल्वे स्थानक येताच पळ काढला. अचानक झालेल्या प्रकाराने महिला प्रवासी मानसिकरीत्या दडपणाखाली गेली होती. त्यामुळे तक्रार दाखल न करताच महिला प्रवासी निघून गेली. सीएसएमटी पोलिसांनी विकृत तरुणाचा फोटो घेतला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.

Post Bottom Ad