वाशी, नवी मुंबई - कोणत्याही हृदयविषयक आजारापासून त्रस्त आणि आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज असलेला नवी मुंबईमधील प्रत्येक तिसरा रुग्ण हार्ट फेल्युरने पीडित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे, वेळेवर निदान, उपचार आणि जागरुकता यांचाही अभाव दिसून आला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जागतिक हृदय दिनानिमित्त वाशी येथील फोर्टीस सहयोगी हॉस्पिटल – हिरानंदानी हॉस्पिटलच्या समर्पित हार्ट फेल्युअर क्लिनिकचे उद्घाटन आज ठाणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गणेश नाईक यांनी केले.
हार्ट फेल्युअर हा गंभीर आजार असून कॉंगेसिव्ह हार्ट फेल्युअर म्हणून देखील ओळखला जातो. हृदयातील स्नायू योग्यरित्या पंपिंगचे कार्य करत नाही तेव्हा हा आजार होतो. यामुळे हृदयाचे अधिक नुकसान होते. गतकाळातील ९ पेक्षा जास्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी क्लिनिकच्या या सादरीकरणाचे समर्थन केले. इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुमार कुंवर, इंटेन्सिव्ह केअर मेडिसीन विभागाचे संचालक डॉ. चंद्रशेखर तुलसगेरी, वाशी येथील फोर्टीस सहयोगी हॉस्पिटल – हिरानंदानी हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट कार्डियोथोरेसिस व व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. भास्कर सेमिता हे हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये सामील आहेत.
वाशी येथील फोर्टीस सहयोगी हॉस्पिटल – हिरानंदानी हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुमार कुंवर म्हणाले, ''हार्ट फेल्युअर हे कार्डियक रुग्णांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण आहे. हार्ट फेल्युअरमागील कारणांवर वेळेवर उपचार, डिवाईस थेरेपीज व हृदय प्रत्यारोपणासह मात करता येईल किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येईल. नवी मुंबईतील लोकसंख्या जलदगतीने वाढत असताना एकाच छताखाली सर्व कार्डियकविषयक समस्यांची काळजी घेणा-या व्यापक केंद्राची गरज आहे.''
आपला पाठिंबा देत ठाणे जिल्ह्याचे गणेश नाईक म्हणाले, ''मी आशा करतो की माझ्या सर्व सहकारी नवी मुंबईकरांना या उपक्रमाचा लाभ होईल आणि हा उपक्रम त्यांना हृदयाची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करेल. माझा हृदयाच्या आरोग्याच्या या उपक्रमाला पाठिंबा आहे. आशा करतो की तुमचा देखील पाठिंबा असेल.''
या सादरीकरणाबाबत बोलताना वाशी येथील फोर्टीस सहयोगी हॉस्पिटल – हिरानंदानी हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. समीर कुलकर्णी म्हणाले, ''हार्ट फेल्युअर क्लिनिकचे सादरीकरण हे नवी मुंबईकरांच्या हृदय आरोग्याची तपासणी करणा-या आमच्या कार्डियक टीमच्या मेहनतीचे फळ आहे. यासह आम्ही शहरातील हार्ट फेल्युअरचे प्रमाण कमी होण्याची आशा करतो.''