पालिकेची उद्याने 12 तास खुली राहणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2018

पालिकेची उद्याने 12 तास खुली राहणार


मुंबई - मुंबई महापालिकेची उद्याने सायंकाळी 7 ते 8 वाजता बंद ठेवण्यात येत होती. मात्र यापुढे पालिकेची सर्व उद्याने 12 तास म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता ही उद्याने सकाळी 6 ते दुपारी 12 व दुपारी तीन ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. 

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे 750 उद्याने आहेत. या उद्यानांचा सकारात्मक परिणाम जसा पर्यावरणाच्या दृष्टीने आहे, तसा तो आरोग्याच्यादृष्टीने आहे. मात्र महापालिकेची उद्यान खात्याच्या अखत्यारित उद्याने खुल्या राहण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तर काही उद्यानांची सायंकाळी बंद होण्याची वेळ 7 ते 8 च्या दरम्यानची होती. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना हवा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9 यानुसार रोज 12 तास खुली ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अखत्यारितील जागांचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग व्हावा, तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळांमध्ये सूत्रूत्रता यावी या हेतूने ही उद्याने रोज 12 तास खुली ठेवली जाणार आहे. सुधारित वेळांचे वेळापत्रक उद्यानांच्या प्रवेशद्वाराजवळा लावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

Post Bottom Ad