‘ कार्डिओ प्‍लमनरी ’ चे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – अजोय मेहता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2018

‘ कार्डिओ प्‍लमनरी ’ चे प्रशिक्षण घेणे काळाची गरज – अजोय मेहता


ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याबाबत जनजागृती मोहिम --
मुंबई - ३५ ते ६० वयोगटातील व्‍यक्‍ति‍ला अचानकपणे येणाऱया ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याला सामोरे जाताना कुटुंबांतील एखादया व्‍यक्तिने तरी ‘ कार्डिओ प्लमनरीचे’ (ह्रदय पुर्नउत्थान) चे प्रशिक्षण घेणे काळाजी गरज असल्‍याचे प्रतिपादन महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी केले.

जागतिक ह्रदयदिनाच्‍या निमित्ताने ‘ कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया’ (सीएसआय) आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका यांच्‍या पुढाकाराने ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याला कसे सामोरे जावे याबाबत जनजागृती करण्‍यासाठी जनजागृती मोहिम आज शनिवार (दि.२९ सप्‍टेंबर २०१८) रोजी वरळी येथील नॅशनल स्‍पोर्टस क्‍लब ऑफ इंडिया येथे आयोजि‍त करण्‍यात आली होती, त्‍यावेळी छोटेखानी समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्‍हणून सुप्रसिध्‍द सिने अभिनेत्री काजोल, मुंबई पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्‍वाल, केईएम रुग्‍णालयाच्‍या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्‍ल केरकर तसेच ‘ कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया’ चे पदाधिकारी व डॉक्‍टर मंडळी मोठया संख्‍येने उप‍स्थित होती.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता मार्गदर्शन करताना पुढे म्‍हणाले की, जीवन शैलीतून होणाऱया या आजाराकडे आपले दुर्लक्ष होते तसेच ज्‍यांना हा आजार आहे त्‍यांना कळत सुध्‍दा नाही, त्‍यामुळे प्रथम प्रतिसाद देण्‍याचे प्रशिक्षण सर्वांनी घेणे आवश्‍यक आहे. याबाबत जनजागृती करण्‍यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आज ज्‍यांनी प्रशिक्षण घेतले त्‍यांनी आपल्‍या जवळच्‍या पाच व्‍यक्तिना प्रशिक्षण द्यावे ज्‍यामुळे आजच्‍या कार्यक्रमाचे उद्दिष्‍ट सफल झाले असेही ते शेवटी म्‍हणाले.

सुप्रसिध्‍द सिने अभिनेत्री काजोल मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या की, सीपीआर प्रशिक्षणामुळे आपण स्वतःसोबतच जगातील कुठल्‍याही व्‍यक्‍तीचे प्राण वाचवू शकणार असल्‍याने आपली भूमिका ही वैश्विक राहणार आहे. उ‍पस्थि‍त असलेल्‍या माध्‍यम प्रतिनिधींनी सुध्‍दा हा संदेश जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करावा, अशी सूचना त्‍यांनी केली. तसेच याप्रकारचे प्रशिक्षण आयोजित केल्‍याबद्दल त्‍यांनी बृहन्‍मुंबई महापालिकेला धन्‍यवाद दिले.

मुंबई पोलिस आयुक्‍त सुबोध जयस्‍वाल यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, सीपीआरचे प्रशिक्षण महापालिकेने आयोजित केल्‍याबद्दल त्‍यांनी महापालिकेला धन्‍यवाद दिले.तसेच मुंबई पोलिसांसाठी मुंबईतील सर्व पोलिस स्‍टेशनमध्‍ये याप्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्‍यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी यावेळी दिली.

केईएम रुग्‍णालयाच्‍या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्‍ल केरकर यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकातून अचानकपणे आलेल्‍या ह्रदयविकाराच्‍या झटक्‍याला कसे सामोरे जावे आणि तातडीने कोणते प्राथ‍मिक उपचार घावेत, याबाबत या मोहिमेत मार्गदर्शन केले. कोणतेही पूर्वसूचना न देता अचानकपणे एखाद्या व्‍यक्तिला ह्रदयविकाराच्‍या झटका आल्‍यानंतर जवळ उपस्थित असलेल्‍या व्‍यक्ती या भांबावून जातात. वेळेत उपचार न मिळाल्‍याने अनेकदा रुग्‍ण दगावण्‍याचाही घटना घडल्‍या आहेत. तेव्‍हा अश्‍या आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये कोणते प्रथमोपचार करावेत याचे प्रशिक्षण या कार्यक्रमामध्‍ये त्‍यांनी मान्‍यवरांच्‍या उपस्थि‍त प्रात्‍याक्षिकाव्‍दारे दिले.

Post Bottom Ad