मुंबई - मुंबई महापालिकेच्या बालवाडीतील विद्यार्थ्यांना बूट आणि सँडल पुरवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. त्याचप्रमाणे महापालिकेच्या बालवाडीमधील विद्यार्थ्यांनाही शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते. या बालवाडीमधील विद्यार्थ्यांना बूट, चप्पल अथवा सँडल यापैकी एकही वस्तू पुरवण्यात येत नाही, हे योग्य नाही. बालवाडीमध्ये येणारी मुले ही गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना बूट खरेदी करणे परवडतेच असे नाही. यामुळे काही विद्यार्थ्यांच्याा पायात चप्पल तर काहींच्या पायात स्लिपर तर काही अनवाणीच असल्याचे निदर्शनास येते. हे लक्षात घेता महापालिकेच्या बालवाडीतील विद्यार्थ्यांना अन्य शालेय वस्तूंबरोबर बूट अथवा सँडल पुरवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांच्या पायात एकसमान बूट अथवा सँडल दिसतील व कोणताही विद्यार्थी अनवाणी राहणार नाही, असे मत डॉ. खान यांनी या पत्रात व्यक्त केले आहे. गुरुवारी होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे..