नवी दिल्ली : वर्तमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या तंबाखू निर्यातीत ७ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत देशातून १४४७.८० कोटींची तंबाखू उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत. बहुतांश निर्यात युरोपीय आणि आग्नेय आशियातील देशांना करण्यात आली आहे. तंबाखू बोर्डाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, तंबाखू आणि त्याची उत्पादने दोन्हीच्या निर्यातीत या कालावधीत २.६५ टक्के वाढून ५३,२१३ टनांवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षी याच कालावधित देशातून ५१,८०२ टन तंबाखू निर्यात करण्यात आला होता. त्या वेळी त्याचे मूल्य १,३५२ कोटी रुपये होते. मात्र सिगारेट, विडी आणि सिगार या उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या एफसीव्ही तंबाखूच्या निर्यातीत यावेळी घट झाली आहे.