वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच शासनाला धोरणात्मक निर्णय घेताना मदत होते - चंद्रशेखर बावनकुळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2018

वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच शासनाला धोरणात्मक निर्णय घेताना मदत होते - चंद्रशेखर बावनकुळे


नागपूर - प्रसार माध्यमांनी चुकत असेल त्याविरोधात आवाज उठवला पाहीजे. कारण राज्य शासनाकडून वृत्तपत्रांच्या मतांचीही दखल घेतली जाते. वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच शासनाला महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना मदत होते. कारण अनेकदा छोट्या छोट्या बातमीमधून महत्त्वांच्या घटनांकडे लक्ष वेधले जाते. एका छोट्या बातमीतून मानव विकास निर्देशांक काढण्याबाबत माहिती मिळाली असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

रविभवन येथे सुरु झालेल्या राज्य अधिस्विकृती समितीच्या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा नियोजन विकास आराखड्यावेळी २२० कोटींचे जिल्ह्याचे बजेट होते. मात्र एका छोट्या बातमीमुळे ते ६५१ कोटी रुपयांचे केल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान असल्याचे सांगून शासन आणि पत्रकारिता यांच्या समन्वयातून विकासाची वाटचाल सुरु होते. राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाचे हित लक्षात ठेवून काम करत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

एका छोट्या बातमीतून पत्रकारितेचे राज्याच्या विकासप्रक्रियेमध्ये महत्त्वाचे योगदान असून, त्यासाठी पत्रकारितेचा प्रत्येक यंत्रणेत सहभाग मिळाला पाहिजे. त्यामुळे समाज विकासाची कामे करताना त्यामध्ये पारदर्शकता येईल. नागपूर येथे सुरु असलेल्या दोन दिवशीय राज्य अधिस्विकृती समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एसएमएसच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री नागपुरातील आहे. त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांलाही माध्यमांनी मोठे केले असल्याचे सांगितले. यावेळी सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले. तर आभार संचालक राधाकृष्ण मुळी यांनी मानले.

Post Bottom Ad