आयात-निर्यात व्यवसायात तूट पाच वर्षांतील उच्चांकावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2018

आयात-निर्यात व्यवसायात तूट पाच वर्षांतील उच्चांकावर


नवी दिल्ली - खनिज तेलाच्या आयात खर्चात वाढ झाल्यामुळे यंदा देशाच्या आयात-निर्यात व्यवसायात तूट आली आहे. जुलै महिन्यात या व्यापारातील तूट वाढून ६२ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. दरम्यान, याच काळात निर्यातीत १४.३२ टक्के वाढ झाली आहे. .

जुलै महिन्यात अभियांत्रिकी आणि रासायनिक उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. तसेच अनेक महिन्यांच्या मंदीनंतर रत्न आभूषणांच्या निर्यातीत अचानक वाढ झाली आहे. मात्र, खनिज तेल महागल्यामुळे एकूण आयात-निर्यात तोटा १८.०२ अब्ज डॉलर झाला आहे. जून महिन्यात हा तोटा १६.६१ अब्ज डॉलर होता. तेल आयातीचा खर्च जुलै महिन्यात ५७ टक्के वाढून १२.३५ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. महिनाभरापूर्वी हा खर्च ७.८४ अब्ज डॉलर होता. जून महिनत तेल आयातीत २१.३१ टक्के वाढ झाली आहे. यंदा जुलै महिन्यात एकूण आयात ४३.७९ अब्ज डॉलर झाली आहे. जून महिन्यात ती ४४.३ अब्ज डॉलर होती. यामुळे वर्तमान वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सरकारच्या चालू खात्यावर दबाव पडण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात देखील तेल आयातीच्या खर्चात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तेल अणि सोन्याची आयात गवळता इतर जिन्नसांच्या आयातीत देखील जुलै महिन्यात दोन अंकी वाढ झाली आहे. अशा जिन्नसांमध्ये यंत्रसामग्री, कोळसा, खत, लोखंड आणि पोलाद या उत्पादनांचा समावेश आहे.

Post Bottom Ad