महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 August 2018

महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली - ‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या, क्रांतीदिनी राष्ट्रपती भवन येथे सन्मान होणार आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 76 व्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

गुरूवारी सन्मान होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ. अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतील गदाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान होणार आहे. ‘भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा मुक्ती संग्राम’, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन,यासोबतच देशभरात झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा दरवर्षी 9 ऑगस्ट ‘क्रांती दिनी’ सन्मान केला जातो.

Post Bottom Ad