मुंबई - सध्या सोशल मीडियावरील व्हॉटसॲप, टेलिग्राम, इ चॅट आदी इन्संस्ट मेसेजिंग साधनामध्ये फेक न्यूज पसरविण्याची जास्त क्षमता आहे. त्यामुळे ही साधने जास्त घातक आहेत. या माध्यमातून येणाऱ्या माहितीचा स्त्रोत शोधणे अथवा ती तयार करणारे शोधणे कठीण आहे. त्यामुळे फेकन्यूज संदर्भात लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती करणे आवश्यक असून खोट्या बातम्या अथवा फेक न्यूजची सत्यता तपासून त्या लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने फेकन्यूज संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राजपूत बोलत होते. यावेळी मुंबई सायबर सेलचे उपायुक्त अकबर पठाण, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, पत्र सूचना कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक (पश्चिम विभाग) नितीन वाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
एखादी घटना अथवा माहितीची मोडतोड करून वेगळा अर्थ काढून ती पसरविण्याचे काम फेक न्यूजच्या माध्यमातून होत असते. ठरविलेल्या अजेंड्यानुसार प्रमोशन करणे, फक्त अफवा पसरविणे, विकृत मनोवृत्ती, फक्त गॉसिपिंग करणे, इनडायरेक्ट मार्केटिंग करणे/दुसऱ्याबद्दल वाईट गोष्टी पसरविणे, बदनामी करणे आदी कारणांसाठी फेक न्यूजचा वापर करण्यात येतो. देशात 1996-97 नंतर इंटरनेटचे जाळे पसरण्यास सुरूवात झाली. गेल्या आठ ते दहा वर्षात समाज माध्यमांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्याचा योग्य वापर करण्याचे तंत्र अद्याप विकसित झाले नसल्याचे राजपूत म्हणाले.
सध्या सोशल मीडिया व व्हॉटसॲप, टेलिग्राम, इ चॅट आदी इन्स्टंट मेसेजिंग अथवा वन टू वन मेसेंजर असणाऱ्या घटकांमुळे फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरविण्यात येत आहे. फेक न्यूजची मूळ पोस्ट तयार करणारे शोधण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु या समाजमाध्यमांचे मुख्यालय किंवा कार्यालये ही परदेशात असल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यास अडचणी येतात. तरीही समाज माध्यमांद्वारे अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. एखादी अफवा अथवा खोटी बातमी समाज माध्यमात आली असल्यास तातडीने पोलिसांना ती माहिती द्यावी. फेक न्यूज आल्यास पत्रकारांनी त्याबद्दल जनजागृती करावी, असेही राजपूत यांनी सांगितले. फेक न्यूजसंदर्भात गुगल व फेसबुक पत्रकारांसाठी एक कार्यशाळा घेणार आहे. यामध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यातून स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे माहितीची खात्री, अचूकता पाहिली जात नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडतात. अशा घटना घडू नये,यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या सामान्य माणसाला व्ह़ॉट्सॲपवर येणारी माहिती खरीच वाटते. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल जागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांनी एखाद्या पोस्टबद्दल खरी माहिती जाणून घेऊनच पुढे पाठवाव्यात. माहितीची खातरजमा करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक ठरले आहे असे सायबर सेलचे उपायुक्त अकबर पठाण म्हणाले.