मुंबई महापालिका शाळेत ११० नवीन वर्ग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 July 2018

मुंबई महापालिका शाळेत ११० नवीन वर्ग


मुंबई - मुंबई महापालिका शाळांमध्ये ११० नवीन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पाचवीच्या ३९९ तर आठवीच्या २१६४० जागा वाढल्याने पाचवीचे सात तर आठवीचे १०३ वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यांतर्गत पालिकेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र विद्यार्थी चौथी, सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर काही प्रमाणात उपलब्ध जागा कमी पडतात. मात्र हे विद्यार्थी बाहेरचे महागडे शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशी मुले शिक्षणापासून वंचीत राहण्याचा शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून आवश्यकतेनुसार दरवर्षी तुकड्या वाढवण्यात येतात. याकडे लक्ष वेधून ११० तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन वर्ग सुरू करण्यासाठी माध्यमनिहाय आवश्यक शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये ७ शाळांमध्ये पाचवी व १०३ शाळांमध्ये आठवीचे नवीन वर्ग सुरू केले जाणार आाहेत. पाचवीचे नवीन वर्ग सुरू होणार्‍या शाळांमध्ये हिंदी माध्यमाची १, उर्दूच्या - ४, तामीळ - १ आणि कन्नड माध्यमाची एक शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे वाढीव तुकड्यांनुसार ३९९ जागा वाढल्या आहेत. आठवीत वाढणार्‍या वर्गामध्ये मराठी माध्यमाच्या २५, हिंदी - ३०, इंग्रजी - ८, उर्दू - १८, तामीळ - २, तलुगू - ५, गुजराती माध्यमाच्या १०३ शाळांमध्ये २१६४० जागा वाढल्या आहेत. 

वाढलेल्या जागा -
२०१४-१५ पासून पालिकेच्या १०० शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. २०१५-१६ पासून ११६ प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे १५२ तर २०१६-१७ मध्ये पाचवीचे ३७ तर आठवीचे १५३ प्राथमिक शाळांमध्ये नवीन वर्ग सुरू केले जाणार आहेत.

Post Bottom Ad