मुंबई - मागील आठवड्यात शनिवार ते बुधवार या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या ७ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. यावर्षी १ जून ते १० जुलै दरम्यान कुलाबा आणि सांताक्रुझमध्ये झालेला पाऊस हा गेल्या ७ वर्षांमधला सर्वाधिक पाऊस असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यंदा सांताक्रुझमध्ये १ हजार ५४७ मिमी. तर कुलाब्यामध्ये १ हजार ३५६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
२०११ मध्ये सांताक्रुझ – १ हजार १६ मिली मीटर, कुलाबा – ७५६ मिली मीटर, २०१२ मध्ये सांताक्रुझ – ५९८.५ मिली मीटर, कुलाबा – ३८१ मिली मीटर, २०१४ सांताक्रुझ – ५५३ मिली मीटर, कुलाबा – ५५८ मिली मीटर, २०१५ सांताक्रुझ – १ हजार ११७ मिली मीटर, २०१६ कुलाबा – ८७६.३ मिली मीटर, २०१६ सांताक्रुझ – १ हजार ४० मिली मीटर, कुलाबा – ७६९.१ मिली मीटर, तर २०१७ सांताक्रुझ – ७१३ मिली मीटर, कुलाबा – ५९४ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती.