मुंबई 8/7/2018 - मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे पश्चिम उपनगरातील बोईसर येथे एक ईमारात कलली आहे. पोईसर डेपो पुनीत नगर येथे ही इमारत आहे. तळ अधिक चार मजली या इमारतीचे बांधकाम आहे. इमारतीमध्ये दोन विंग असून प्रत्येक विंगमध्ये २० रूम आहेत. इमारत कलल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. पोलीस आणि अग्निशमन दलाने इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारत रिकामी केली आहे. पालिकेच्या स्ट्रक्चरल कंसल्टंटना घटनास्थळी बोलवण्यात आले असून इमारतीचे परिक्षण केले जात आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर इमारतीमधील रहिवाशांना राहायला द्यायचे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.