नागपूर - दुधाच्या निर्यातीसाठी 5 रुपये प्रतिलिटर व दूध भुकटीच्या निर्यातीसाठी 50 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे विधानसभेत पदुममंत्री महादेव जानकर व विधानपरिषदेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घोषित केले.
10 जुलै रोजी घोषित केलेली योजना तसेच आज रोजी घोषित करण्यात येत असलेली योजना या दोन्ही योजनांचा लाभ संबंधित सहकारी/खासगी दूध प्रक्रिया संस्था/दूध पुरवठा करणाऱ्या संस्था यांनी जर 21 जुलै पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिलिटर दर दिल्यासच अनुज्ञेय राहील. वरील निर्णयास राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध उत्पादक/दूध प्रक्रिया करणाऱ्या/दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांनी एकमताने सहमती दर्शविलेली आहे.