मुंबई - म्हाडाच्या ५६ वसाहती असून येथील जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण आणि उन्नतीकरणाचे काम आता म्हाडा प्राधिकरण करणार आहे. जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण आणि उन्नतीकरण कोणी करायचे याबाबत म्हाडा आणि महापालिकेमध्ये संभ्रम होता. याबाबत आमदार मंगेश कुडाळकर यांनी गेल्या चार वर्षापासून म्हाडा प्राधिकरणाबरोबरच गृहनिर्माणमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला असून वेळोवेळी बैठकाही घेतल्या आहेत. तसेच विधानसभेतही लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून म्हाडाने नूतनीकरणाचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. कुर्ला नेहरूनगर, टिळक नगर, न्यू टिळक नगर, सुभाष नगर (चेंबूर) या वसाहतींच्या मलनिस्सारण वाहिनीच्या नूतनीकरणाचे आणि उन्नतीकरणाच्या कामासाठी अंदाजप्रत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून लटकलेले हे काम मार्गी लागणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.