मुंबई - राज्य शासन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचे कारण देत काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाने गोदावरी पात्रता उडी मारुन आपला जीव गमवावा लागला आहे. या कारणाने मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी २४ जुलैरोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात उद्या, तर बुधवारी मुंबईत बंद पाळण्यात येणार आहे. पंढरपुरात आषाढीसाठी मोठ्या संख्येने वारकरी आले आहेत. त्यांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा. त्यांची वाहने, एसटी बसगाड्यांना लक्ष्य करण्यात येऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवसांत राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही तर राज्यभर उद्रेक होईल. त्यातून उद्भवणाऱ्या स्थितीला पूर्णपणे शासन जबाबदार असेल असेही समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कसा झाला मृत्यु -
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे (रा. नागड कानडगाव, गंगापूर ) या युवकाचा मृत्यू झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रोडवरील कायगाव येथील गोदावरी पात्रात उडी घेतली होती.