दहिसर येथे खदाणीत बुडाल्याने एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2018

दहिसर येथे खदाणीत बुडाल्याने एकाचा मृत्यू


मुंबई - खदाणीत बुडाल्याने एका ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दहिसर येथे घडली. दहिसर पूर्व येथील लोधू कम्पाउंडमधील शीतल बार जवळ खदाण आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खदाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरातील अनेक मुले तेथे पोहण्यासाठी येतात. दुपारी सव्वातीनच्या सुमारास एक इसम या खदाणीत बुडाल्याचे तेथील लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस, पालिकेच्या वार्ड कार्यालयातील कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य हाती घेऊन सदर इसमाला बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नारायण (५५) असे या घटनेत मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Post Bottom Ad