मुंबई - दिंडोशी पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण (३०) यानी एका कपडे व्यापाऱ्याकडून दहा हजाराच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी व्यापाऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार करताच चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण सध्या गावाकडे गेले असल्याने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराबाहेर पहारा ठेवला आहे. रद्द झालेल्या कपड्याच्या ऑर्डरचे पैसे परत न दिल्याबाबत तक्रारदाराने दिंडोशी पोलीस ठाण्यात या व्यापाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण उपनिरीक्षक चव्हाण हाताळत होते. या तक्रारीविरुद्ध सदर व्यापाऱ्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी चव्हाण याने दहा हजाराची लाचेची मागणी केली. या प्रकरणी लाचलुचपत विभागाकडे लाचलुचपत विभागाकडे तक्रार आल्यानंतर चव्हाण याच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.