पावसाने मुंबईला झोडपले - एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2018

पावसाने मुंबईला झोडपले - एकाचा मृत्यू


मुंबई - आठवडाभराच्या विश्रांती नंतर मुंबईत शनिवारीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारीही राहिला. संततधार पडलेल्या पावसाने मुंबईला अक्षरशा झोडपून काढले. पावसामुळे साचलेल्या पाण्यात खड्डा न दिसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईमधील पावसाची आकडेवारी -
कुलाबा वेधशाळेनुसार २४ जून ते २५ जून या कालावधीत सांताक्रुझ येथे २३१.४ मिमी तर कुलाबा येथे ९९ मिमी पावसाची नोंद झाली. महानगरपालिकेने बसविलेल्या ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांपैकी शहरात एफ/उत्तर येथे १८२ मिमी, वडाळा १७३ मिमी, धारावी १६८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पश्चिम व पूर्व उपनगरात बोरीवली २३७ मिमी, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह २२९, कांदिवली वर्कशॉप २२८, दहिसर २१५, भांडूप १८२, मुलुंड १७८,गवाणपाडा १७६, एल विभाग १६७ पावसाची नोंद झाली.

साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई शहर व उपनगरात १८३ ठिकाणी उदंचन संच सुरु करण्यात आले तसेच मुख्य ७ उदंचन केंद्रातील २२ इतके संच वापरण्यात आले.

या ठिकाणी साचले पाणी -
पावसामुळे सायनरोड नंबर 24, महेश्वरी उद्यान, समाज मंदिर हॅाल प्रतीक्षा नगर, चेंबूर फाटक, मोरारजी नगर, फिल्टरपाडा, मिलन सबवे, साईनाथ सबवे, मालाड, नॅशनल कॅालेज, एस व्ही रोड, सिध्दार्थ हॅास्टिपटल गोरेगाव आदी ठिकाणी पाणी साचले. पश्चिम उपनगरातील सर्वच सबवे पाण्याखाली गेले होते.

वाहतुकीवर परिणाम - 
रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईमध्ये सायन रोड नंबर 24, किंग सर्कल, नॅशनल कॉलेज बांद्रा, सिद्धार्थ हॉस्पिटल गोरेगाव, चेंबूर फाटक, प्रतीक्षा नगर सायन, मिलन सबवे सांताक्रूझ, मोरारजी नगर पवई, फिल्टरपाडा पवई आदी भागातील वाहतूक वळवण्यात आली होती. 

रेल्वे ट्रॅक वर पाणी - 
पावसाचे पाणी सायन आणि माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिरा धावत होत्या.

एकाचा मृत्यू -
सकाळी एव्हरशाईन नगर येथील हिमाचल बिल्डिंग समोरील नाल्यातएका व्यक्तीला गटाराच्या खड्ड्यात काही तरंगताना दिसले. त्याने त्या वस्तूला बांबूच्या सहाय्याने हलवले असता त्याला माणसाचे तोंड दिसले. त्याने पोलीस कंट्रोलला याची माहिती दिली. त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून पालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचे नाव नागेंद्रा नागार्जुन असून तो 18 वर्षाचा आहे.

पडझडीच्या घटना / जखमी - 
शहरात ३ पूर्व उपनगरात १ व पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ७ ठिकाणी घराचा / भिंतीचा भाग कोसळला. 
पायधुनी येथील नागदेवी स्ट्रीट वरील चार माजली इमारताचा काही भाग आज कोसळला. सुदैवाने इमारत खाली असल्याने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अंधेरी सहार पोलीस स्टेशन जवळील जाधव चाळीमधील बाल्कनीचा काही भाग कोसळला. यात राजकुमारी गौड (35) ही महिला जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. काळबादेवी येथील आनंदी पोद्दार मार्गाखाली असलेली पाण्याची पाईप लाईन फुटल्याने रस्ता खचला आहे.

Post Bottom Ad