एसटी भाडेवाढ दोन ते तीन दिवस टळली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2018

एसटी भाडेवाढ दोन ते तीन दिवस टळली


मुंबई - एसटी महामंडळाने तोटा कमी करण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ जूनपासून तिकीट दरात १८ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार होती; परंतु या तिकीट दरवाढीला अद्याप राज्य परिवहन प्राधिकरणाची (एसटीए) परवानगी मिळाली नसल्यामुळे ही भाडेवाढ दोन ते तीन दिवसांसाठी टळली आहे.

गेल्या काही दिवसांत सातत्याने डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. एसटीला १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेल लागते. डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळावर दरवर्षी ४६० कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच ४,८४९ कोटी रुपये वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळेही एसटी महामंडळावर प्रत्येक वर्षी १,२०० कोटी रुपयांहून अधिक बोजा पडणार आहे. हा भार कमी व्हावा या हेतूने एसटी महामंडळाने १४ जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरांत १८ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या दरवाढीमुळे महामंडळाला प्रत्येक वर्षी एक हजार कोटी ते १,५०० कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिकीटाची भाडे आकारणी ही पाच पटीत असणार आहे.

Post Bottom Ad