चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात लढा उभारला जाईल - बी. जी. कोळसे पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2018

चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात लढा उभारला जाईल - बी. जी. कोळसे पाटील

मुंबई - सरकार जनतेच्या हिताचे नाही असे जाहीरपणे सांगणा-या चळवळीतील कार्यकर्त्यांना नक्षलवादाशी जोडून बदनाम केले जाते आहे. पुण्यात झालेल्या यल्गार परिषदेचा भीमा कोरेगाव दंगलीशी संबंध जोडून पाच चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, हा सर्व बनाव असून याविरोधात लढा उभारला जाईल असा इशारा निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला. यावेळी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पाचही कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली. 

मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोळसे पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्यासह इंदिरा जयसिंग, मिहीर देसाई, अॅड. माहरूख अडेनवला, बिलाल खान, अभिर पालट, फिरोज मिठीबोरवाला, सादिक कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेला भीमा -कोरेगाव दंगलीशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढून पाच मुंबई, नागपूर व दिल्ली येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यांत एल्गार परिषदेचे आयोजक व विद्रोही मासिकाचे संपादक सुधीर ढवळे, वकील सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना यांचा समावेश आहे. पुण्याला झालेल्या यल्गार परिषदेत कोणतेही प्रक्षोभक भाषणे झाली नाहीत. मात्र याचा भीमा -कोरेगावच्या दंगलीशी संबंध जोडला जातो आहे. या परिषदेत वकील असलेले सुरेंद्र गडलिंग हे परिषदेला उपस्थित नसताना त्यांनाही अटक करण्यात आली आहे. चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याचे कोळसे -पाटील यांनी म्हटले. 

अटक झालेले कार्यकर्ते हे सामाजिक चळवळीळी जोडलेले आहेत. जनतेच्या हिताचे नसलेले सरकार व आरएसएस मुक्त भारत यादृष्टीने होत असलेली जनजागृती सरकारला रुचत नसल्याने दलित कार्यकर्त्यांना नक्षलवादाशी जोडून बदनामी केली जाते आहे. मात्र या विरोधात संघर्ष केला जाईल. ही अटक कशी बेकायदेशीर आहे, याबाबत गावागावांत जाऊन जनजागृती केली जाईल. यासाठी आता विविध संस्था, संघटना एकत्र येत असून दहशतीविरोधात एकत्रित लढा उभारला जाणार असल्याचे कोळसे - पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी अटकेत असलेले सुरेंद्र गडलिंग हे वकील आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते आयसीयुमध्ये होते, त्यावेळीही त्यांच्या हातात बेड्या होत्या. ससून रुग्णालयात असताना त्यांची तब्बेत निट नसतानाही त्यांना डिसचार्ज देऊन अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबांना याचा पत्ताच लागू दिला नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. यल्गार परिषदेचा कार्यक्रम झाला तो स्टेज पूर्वीच्या कार्यक्रमाचा होता. या कार्यक्रमाला फंड नक्षलवादाकडून पुरवला गेला होता, हा आरोपही चुकीचा आहे. चळवळीला नक्षलवादाकडून फंड पुरवण्यात आल्याचा आरोपही खोटा असल्याचे कोळसे - पाटील यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad