आरक्षण हिरावले, तर थप्पड मारून मिळवा - कल्याण सिंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2018

आरक्षण हिरावले, तर थप्पड मारून मिळवा - कल्याण सिंग


लखनऊ - 'आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क असून हा हक्क कुणी काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास थप्पड मारून तो हक्क पुन्हा मिळवा' असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी केले आहे. काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत हा अधिकार गमावू नका, असेही सिंग म्हणाले. आपण घटनात्मक पदावर असल्याने राजकारणाबाबत वक्तव्य करू शकत नाही. मात्र सामाजिक विचार जरूर व्यक्त करू शकतो, असे म्हणत सिंग यांनी आपल्या विचारांमधून राजकीय गर्भितार्थ शोधण्याचे आव्हान केले. 

माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्ही. पी. सिंग यांच्या कार्याबाबत बोलताना सिंग म्हणाले की, 'आरक्षण मिळवण्यासाठी किती संघर्ष करावे लागले ते माजी पंतप्रधान दिवंगत व्ही. पी. सिंग यांना विचारा. त्यांनी तुमच्यासाठी मंडल आयोग लागू केला. त्यावेळी देशात काय परिस्थिती निर्माण झाली होती. लाठ्याकाठ्या, गोळ्या सर्वकाही वापरले गेले. रक्तसुद्धा वाहिले, परंतु त्यांनी कशाचीही पर्वा न करता मंडल आयोग लागू केला. त्यांच्यामुळेच तुम्ही आहात. त्यांनी तुम्हाला दिलेले हे हक्क कुणी कितीही काढून घेण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तुम्ही ते त्यांना काढून घेऊ देता कामा नये.'  

Post Bottom Ad