मुंबई - मुंबई व उपनगरांतील डोंगर उतारावरील झोपड्यांवर दरडी कोसळू शकतील अशी 290 धोकादायक ठिकाणे दरडीच्या भयाखाली आहेत. यातील सर्वात जास्त 219 ठिकाणे एकट्या पूर्व उपनगरात आहेत. दरडी कोसळून जिवित व वित्तहानी होऊ नये याकरिता संरक्षण भिंती बांधण्याबाबत म्हाडा प्राधिकरणास सुचना करण्यात आली आहे. तर धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महापालिके नोटीस बजावल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या काही दिवस आधी मुंबई महापालिकेकडून झोपड्यांवर नोटिसा चिकटवण्याची नेहमीची जबाबदारी पार पाडली जाते. रहिवाशांनी त्वरीत स्थलांतरीत व्हावे, अशा नोटिशीमध्ये सूचना असतात. इतकी कुटुंबे स्थलांतरीत कुठे होणार हा प्रश्न असल्याने पाऊस संपेपर्यंत जीव मुठीत घेऊन रहिवाशांना त्याच झोपड्यात राहण्याचा निर्णय घ्यावा लागतो. केंद्र सरकारने केलेल्या सुचनेनुसार पालिकेने मुंबईतील दरडी कोसळण्याच्या 299 ठिकाणांची पाहणी करुन धोकादायक, अतिधोकादायक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात सुमारे 290 ठिकाणे दरडीच्या भयाखाली असल्याचे म्हटले आहे. शहरात 38, पश्चिम उपनगरात 33 आणि पूर्व उपनगरात 219 ठिकाणी दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका आहे. तर 24 प्रभागात अतिधोकादायक ठिकाणे 20 असून पूर्व उपनगरात 16 ठिकाणांचा समावेश आहे.
दरडी कोसळण्याची ठिकाणे -
विभाग संभाव्य धोका धोका नसलेली ठिकाणे मध्यम धोका अतिधोकादायक
शहर 38 01 00 01
पू. उपनगर 219 59 01 16
पश्चिम उपनगर 33 02 39 03
एकूण 290 62 40 20
विभाग संभाव्य धोका धोका नसलेली ठिकाणे मध्यम धोका अतिधोकादायक
शहर 38 01 00 01
पू. उपनगर 219 59 01 16
पश्चिम उपनगर 33 02 39 03
एकूण 290 62 40 20