पालिका सफाई कर्मचारी सुनील यादवची साता समुद्रापार भरारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 May 2018

पालिका सफाई कर्मचारी सुनील यादवची साता समुद्रापार भरारी

मुंबई / जेपीएन न्यूज टीम -
सफाई कामगार असलेल्या सुनील यादव या कर्मचाऱ्याने मुंबई महापालिकेत प्रशासनाकडून अनेक अडचणी आणल्यानंतरही आपल्या जिद्दीच्या जोरावर साता समुद्रपार भरारी घेतली आहे. जगभरातील 15 देशांतील 50 विद्वानांना त्यांचा प्रबंध सादर करण्यासाठी बोस्टनमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. त्यात सुनीलचा समावेश असून त्याने नुकताच कोलंबिया विद्यापीठात 'ह्युमिलिएशन बाय बर्थ - अ केस ऑफ स्केव्हेंजिंग, क्लीनिंग इन इंडिया' या विषयावर प्रबंध सादर केला. सध्या सुनील अभ्यास दौऱ्यावर आहे.

मुंबई महापालिकेच्या डी विभागातील सफाई खात्यात सुनील यादव सफाई कामगार म्हणून गेले १३ वर्षे नोकरी करत आहे. आपण आयुष्यभर सफाई कामगार राहू नये आपली मुले चांगली शिकावीत म्हणून त्याने नोकरी करताना शिक्षण घेण्यास सुरुवात केली. जस जसा सुनील उच्च शिक्षण घेऊ लागला तश्या त्याच्या अडचणीत वाढ होत गेली. एमए झाल्यावर त्याने सुनील यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून जागतिकीकरण आणि कामगार या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सध्या व्यवस्थापन आणि कामगार या विषयामध्ये पी.एच.डी करत आहेत.

एमफीलसाठी टाटा इन्स्टिट्यूट मधून प्रवेश घेतला मात्र शैक्षणिक सुट्टी त्याला नाकारण्यात आली. शिक्षण घेणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना दोन वर्षे भर पगारी सुट्टी मिळते अशी सुट्टी त्याला देण्यास नकार दिल्याने एससी एसटी आयोग, केंद्रीय एससी एसटी आयोग, उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डी विभागातून आपल्या राहत्या घराजवळ चेंबूर येथील एम विभागात बदली मागाईतली होती. प्रशासनाने सुनीलला बदली न देता नोकरीवरून काढून टाकले होते. एमफिल प्रमाणेच पीएचडी करतानाही सुनीलला सुट्टीसाठी झगडावे लागत आहे. सुनील काम करत असलेले पालिका प्रशासन विरोधात असताना विरोध झुगारून सुनील साता समुद्रापार अमेरिकेच्या कोलंबो विद्यापीठात पोहचला आहे.

मन भरून आले - 
बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे शिक्षण घेतले त्या कोलंबिया विद्यापीठाला मी भेट दिली. मन भरून आले, ही जागा प्रचंड उर्जा आणि आत्मविश्वास देऊन गेली. एक सफाई कामगार म्हणून हा विचार कधीही केला नव्हता, परंतु सतत प्रयत्न आणि शिक्षणामुळे मी हि उंची गाठू शकलो. जिथे सर्व देशाचे नेते येतात आणि भाषण करतात ते संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय आणि जनरल असेम्ब्ली हॉलला मी भेट दिली. याठिकाणी मी पोहचू शकतो याची कल्पना मी कधीही केली नव्हती. आज मी या ठिकाणी फक्त माझ्या शिक्षणामुळे पोहचू शकलो.
- सुनिल यादव,

सुनीलने मिळवलेल्या पदव्या - 
सुनील यादव याने सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करताना बी.कॉम, बीए, पत्रकारितेत बीए, डीएसडीडब्लू, एमएसडब्लू आणि एमए (ग्लोबलायझेशन अँड लेबर) एम.फिल या पदव्या मिळवल्या आहेत. सध्या पीएचडीची तयारी सुरु आहे.

Post Bottom Ad