मुंबई - नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून लवकरच दहावीचा निकालही अपेक्षित आहे. महाविद्यालय प्रवेशासाठी विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ ही होणारच… एकाच वेळी मोठ्या प्रमाणात येणारे अर्ज… त्यामुळे दाखले वितरित करण्यास विलंब होण्याची शक्यता..दाखले मिळेपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक ठरलेलीच! मात्र जर हे दाखले घराच्या जवळपासच आणि निश्चित केलेल्या तारखेलाच उपलब्ध करुन दिले तर? तर निश्चितच पालक व विद्यार्थी वर्ग आनंदी होईल; आणि यासाठीच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विद्यार्थ्यांचे दाखले वाटपासाठी विशेष दाखला वाटप महाशिबिरे आयोजित केली आहेत.
कुर्वे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना जात दाखले, उच्च उत्पन्न गटात मोडत नसल्याबद्दलचा दाखला (नॉन- क्रिमीलेअर सर्टिफिकेट), वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, स्थानिक अधिवासाचा दाखला, उत्पन्न दाखला असे दाखले निश्चित तारखेला देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला तालुक्यांमध्ये येत्या जूनमध्ये भव्य महाशिबिरांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांच्या दाखल्यांशिवाय ज्येष्ठ नागरिकांनाही वयाचे प्रमाणपत्र या शिबीरांमधून वितरित केले जाणार आहेत. या तीनही तालुक्यांच्या तहसील कार्यालयातील सेतू कक्ष आणि महा-ई-सेवा केंद्रामध्ये दिनांक 1 जून ते 29 जून या कालावधीत स्वीकारण्यात आलेल्या अर्जांचे दाखले विविध शिबिरांच्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी होणारी धावपळ आणि दाखले प्राप्त करण्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन या शिबिरांचे आयोजन केले आहे. अर्ज केल्यानंतर निश्चित शिबिराच्या ठिकाणी आपला दाखला हमखास मिळेल याची विद्यार्थ्यांनी खात्री बाळगावी. तोपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासाठी निश्चिंत मनाने तयारी करावी.
– सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर
अंधेरी विभागात 5 शिबिरे -
अंधेरी तालुका सेतू कक्ष आणि महा-ई-सेवा केंद्रामध्ये दि. 1 ते 7 जून दरम्यान स्वीकारलेल्या अर्जांसाठीचे सर्व दाखले 8 जून रोजी तहसील कार्यालयाच्या सेतू कक्षात वितरित करण्यात येणार आहे. 9 ते 15 जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले दि. 16 जून रोजी बांद्रा (पूर्व) येथील महात्मा गांधी विद्यालयात वितरित केले जातील. 17 ते 22जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले 23 जून रोजी अंधेरी (पूर्व) येथील गुंदवली म्युनिसिपल स्कूलमध्ये तर दिनांक 24जून रोजी जोगेश्वरी (पूर्व) येथील अरविंद गंडभिर विद्यालयात वितरित केले जातील. 24 ते 29 जून दरम्यानच्या अर्जांसाठीचे दाखले 30 जून रोजी अंधेरी (पूर्व) येथील आर. सी. मारुती विद्यालयात वितरित केले जातील.
बोरीवली विभागात 10 शिबिरे -
बोरीवली तालुक्यात दाखले वितरणासाठी दि. 3 जून रोजी चारकोप, कांदिवली (प.) येथील एन. डी. पाटील विद्यालय, 7 जून रोजी मागाठाणे, बोरीवली (पू.) येथील योजना विद्यालय, 9 जून रोजी कांदिवली (प.) येथील वळणई वसाहत म्युनिसीपल स्कूल, 13 जून रोजी मालाड (प.) येथील हिरादेवी मुख्य मंदिर सभागृह, 16 जून रोजी मालाड (प.) येथील ज्ञानसाधना विद्यालय, 20 जून रोजी तीनडोंगरी, गोरेगाव (प.) येथील 163 गोरेगाव विधानसभा मतदार संघ समाज मंदीर सभागृह, 23 जून रोजी आनंद नगर, दहिसर (पू.) येथील मातृछाया स्कूल व ज्युनिअर कॉलेज, 26 जून रोजी मालाड (पू.) येथील निर्मला स्कूल व ज्युनिअर कॉलेज, 28 जून रोजी मालवण्णी गेट न. 6,मालाड (पू.) येथील मदर तेरेसा स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि 30 जून रोजी बोरीवल (प.) येथील सेंट रॉक्स स्कूल व कॉलेज येथे दाखले वितरीत करण्यात येतील.
कुर्ला विभागात 4 शिबिरे -
कुर्ला तालुका सेतू कक्ष आणि महा-ई-सेवा केंद्रामध्ये दि. 1 ते 7 जून दरम्यान स्वीकारलेल्या अर्जांसाठीचे सर्व दाखले8 जून रोजी कुर्ला तहसील कार्यालयाच्या सेतू कक्षात वितरित करण्यात येणार आहे. 9 ते 15 जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले दि. 16 जून रोजी विद्याविहार (प.) येथे असलेल्या मंडळ अधिकारी कुर्ला व तलाठी कार्यालयामध्ये वितरित केले जातील. 17 ते 22 जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले 23 जून रोजी आणिक गाव, वाशी नाका, चेंबूर येथील म. न. पा. शाळेत वितरित केले जातील. 24 ते 29 जून दरम्यानच्या अर्जांसाठीचे दाखले 30 जून रोजी मुलुंड (प.) येथील तहसील कार्यालयासमोरील मंडळ अधिकारी घाटकोपर व तलाठी कार्यालयातून वितरित केले जातील.