मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स, आया, वार्डबॉय पासून अनेक हजारो पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने वेळोवेळी रिक्त पदे भरण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या मागणीनुसार महापालिकेने नर्स पदासाठी ८६७ उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवली आहे.
मुंबई महापालिका रुग्णालये, विशेष रुग्णालये व प्रसूतीगृहे यामधील ८६७ पदे भरण्यासाठी महापालिकेच्या व इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळांमधून जनरल नर्सिंग व मिडवायफारी डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ८६७ पैकी ९० टक्के पदे म्हणजेच ७७९ जागा पालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागा भरताना अजा १०४, अज ७१, विजा(अ) २३, भज (ब) १६, भज (क) १७, भज (ड) १०, विमाप्र ११, इमाव १२१, खुला ४०६ अशा जागा भरण्यात येणार आहेत. यात ५ टक्के जागा खेळाडू, खुल्या वर्गातली १ टक्के म्हणजेच ५ जागा अनाथ, अपंगांसाठी ३ टक्के १३३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
तर इतर परिचर्या शाळेतून उत्तीर्ण उमेदवारांसाठी राखीव असलेल्या १० टक्के जागा म्हणजेच ८८ जागा पालिका व ठेवण्यात आल्या आहेत. यामधून अजा १०, अज ८, विजा(अ) २, भज (ब) २, भज (क) ३, भज (ड) १, विमाप्र २, इमाव १३, खुला ४७ जागा भरण्यात येतील. यापैकी ५ टक्के जागा खेळाडू, खुल्या वर्गातली १ टक्के म्हणजेच ५ जागा अनाथ, अपंगांसाठी ३ टक्के १३३ जागा तर खेळाडूंसाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी १४ मे पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले अर्ज कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, एफ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, ३ रा मजला, आवक जावक विभाग, रूम क्रमांक ५६, डॉ. आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई - १२ या पत्यावर पाठवावेत असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment