मोदी सरकारच्या पराभवाची सुरुवात भंडारा गोंदिया मधून करा - धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2018

मोदी सरकारच्या पराभवाची सुरुवात भंडारा गोंदिया मधून करा - धनंजय मुंडे


भंडारा - अच्छे दिनाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवण्याची पहिली संधी देशात भंडारा गोंदिया येथील मतदारांना मिळाली आहे आहे . 28 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव करून देशातील परिवर्तनाची सुरुवात भंडारा-गोंदिया तून करावी असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे आघाडीचे उमेदवार मधुकरराव कुकडे यांच्या प्रचारार्थ भंडारा येथील किसान चौकात तसेच लाखनी येथे झालेल्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, आमदार प्रकाश गजभिये, आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार सेवकभाऊ वाघाळे, प्रेमसागर धनवीर, ईश्वर बालबुद्धे आदींसह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.

ही पोट निवडणूक निवडणूक मोदींच्या अहंकारामुळे आणि त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे होत असल्याचे मुंडे म्हणाले. देशातील मोदी- शहा यांच्या यांच्या हुकूमशाही वाटचालीला पहिला विरोध नाना पटोले यांनी केला. आज देशात प्रचंड महागाई वाढली आहे , अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची सातत्याने फसवणूक केली जात आहे . कर्जमाफी च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली .शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही याच मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण देशातील जनता त्यामुळे त्रस्त झाली आहे. जनतेला हा राग आता आता व्यक्त करायचा आहे ती संधी देशात सर्वप्रथम भंडारा-गोंदिया येथील मतदारांना मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या दोन जागांवर पराभव, कर्नाटकमधील पराभव ही भाजपाच्या अस्ताची सुरुवात असून महाराष्ट्रातील त्याचा शुभारंभ या मतदारसंघाने करावा असे आवाहन त्यांनी केले. सरकारच्या धोरणाचा विरोध करणारे नाना पटोले हे जीगरबाज नेते असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रफुल्ल पटेल हे देशातील राजकारण करणारे नेते आहेत . देशातील कोणतीही घडामोड त्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा या नेतृत्वाला जपण्यासाठी त्यांना बळ आणि ताकद देण्यासाठी या निवडणुकीत मधुकर कुकडे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Post Bottom Ad