पर्यटन स्थळे म्हणून उद्यानाचा विकास करा - यशवंत जाधव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2018

पर्यटन स्थळे म्हणून उद्यानाचा विकास करा - यशवंत जाधव

मुंबई - जगातील सात आर्श्चयांच्‍या प्रतिकृती असलेल्या जोसेफ बाप्‍टीस्‍टा उद्यानाच्या धर्तीवर मुंबईतील उद्यानांंचा विकास करा. उद्यानाचा सर्वांगीण विकास केल्यास मुंबईकरांसाठी चांगले पर्यटनस्‍थळ म्‍हणून उद्याने नावारुपास येतील, असे प्रतिपादन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले. बाप्टीस्टा उद्यानाच्या भूमीपूजनावेळी जाधव बोलत होते. यावेळी महापालिका उप आयुक्‍त डॉ. किशोर क्षीरसागर, प्रकाश कदम उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी), ई विभागाचे सहाय्यक आयुक्‍त साहेबराव गायकवाड व संबधित अधिकारी उपस्थित होते.

भंडारवाडा जलाशय, माझगाव येथील जलाशयाच्‍या टेकडीवर हे जोसेफ बाप्‍टीस्‍टा उद्यान असून या उद्यानामध्‍ये जगातील सात आश्‍चर्यांमध्‍ये ख्रिस्‍टरिओचा पुतळा, पिसाचा झुकता मनोरा, मेक्‍सीकोतील चिचेन इल्‍झा, आयफेल टॉवर, रोमन कोलोझि‍म, स्‍टॅुच्‍यु ऑफ लिबर्टी, ताजमहल या सात आश्‍चर्यांचा शिल्‍पाकृतींचा समावेश करण्‍यात येणार आहे. त्‍यासोबतच आवश्‍यक असणारे फॅ‍ब्रिकेशनचे काम व पाया बांधणे, स्‍टेनलेस स्‍टीलचे कुंपण बसविणे,सूचना फलक बसविणे, शिल्‍पाकृतींच्‍या सभोवताली रंगीत दिवाबत्‍ती/ रोषणाई व उद्यानवि‍षयक हिरवळ, सुशोभिकरणे करणे आदीं कामाचा समावेश आहे. या कामासाठी अंदाजित दीड कोटी रुपये खर्च येणार असून हे काम सहा महिन्‍याच्‍या कालावधीत पूर्ण करण्‍याचे प्रस्‍तावित आहे. जाधव पुढे म्‍हणाले की, माजी नगरसेविका यामिनी जाधव यांची सात आश्‍चर्यांच्‍या समावेश असलेले उद्यान विकसित करण्‍याची ही संकल्‍पना असून त्‍यांनी त्‍यांच्‍या नगरसेवक पदाच्‍या कालावधीत यासाठी प्रयत्‍न केले होते. याठिकाणी व्‍हिंव्‍हीग गॅलरी सुध्‍दा विकसित करण्‍यात येणार आहे. त्‍यासोबतच याठिकाणी शंभर फुटाचा तिरंगा ध्‍वज उभा करणार असून प्रवेशव्‍दाराचे सुध्‍दा सुशोभिकरण जलखाते व उद्यान खाते हे संयुक्‍तपणे करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. दरम्यान, हे उद्यान मुंबईकरांसाठी चांगले पर्यटनस्‍थळ म्‍हणून विकसित करण्‍याचा महापालिका प्रयत्‍न करणार आहे. तसेच उद्यानाचा सर्वांगीण विकास करणार असल्‍याचे महापालिका उप आयुक्‍त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad