मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2018

मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय


मुंबई दि. ३ - राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता) प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेला ऑफलाईन पद्धतीने वितरित केली जाणार आहे. 

मागासप्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण व परीक्षा शुल्काची रक्कम प्राप्त होऊ न शकलेल्या महाविद्यालय-शैक्षणिक संस्थांना केवळ 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी काही अटी व शर्तींवर प्रलंबित रक्कम देण्यात येणार आहे. महाविद्यालयांकडील प्रवेशित पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी आजअखेर लाभ देण्यात आलेले विद्यार्थी वगळून उर्वरित विद्यार्थ्यांच्या पात्र अभ्यासक्रमांसाठी देय होणारी रक्कम चार आठवड्यात दिली जाईल.

Post Bottom Ad