मुंबई - कुलाबा येथील एका कपड्याच्या दुकानाला शनिवारी रात्री उशीरा भीषण आग लागली. या आगीत सदर दुकान खाक झाले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी दुकानातील सामान जळून खाक झाल्याने वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली.
पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहीद भगतसिंग रोडवर रिगल चित्रपटगृहाजवळ इलेक्ट्रिक हाऊसच्या बाजूला कपड्याचे दुकान आहे.२५०० चौरस फुटाच्या जागेत असलेल्या या दुकानाला काल रात्री १० वाजून ५४ मिनिटांनी अचानक आग लागली. यावेळी हे दुकान बंद होते. काही क्षणातच या दुकानाला आगीने वेढले. तेथील कपड्यांनी पेट घेतला आणि घटनास्थळी आगडोंब उसळला. हा प्रकार लक्षात येताच लोकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळवले .अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी रवाना झाले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे ११ वाजून १८ मिनिटांनी नंबर -२ लेव्हलची आग घोषित करण्यात आली. ४ फायर इंजिन , ४ वॉटर टँकरच्या साह्याने अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने मध्यरात्री २ वाजता या याआगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत सदर दुकान जळून खाक झाले. यामुळे प्रचंड नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमूळे लागल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment