नाल्यांमध्ये कचरा - पालिकेला पुन्हा झाली क्लिनअप मार्शलची आठवण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2018

नाल्यांमध्ये कचरा - पालिकेला पुन्हा झाली क्लिनअप मार्शलची आठवण


मुंबई - महापालिकेने नाल्यांत कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी क्लीनअप मार्शल योजना सुरु करण्याचे जाहीर केले होते. गेल्या दोन वर्षात कुठेही असे क्लीनअप मार्शलचा वापर करण्यात आलेला नाही. आता पुन्हा पालिकेला क्लीनअप मार्शलची आठवण झाली असून नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी क्लिनअप मार्शलची मदत घेतली जाणारा आहे. याबाबतचा लवकरच अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिका-याने दिली.

मुंबईतील नाल्यांमध्ये कचरा फेकण्याचे प्रमाण वाढते आहे. मुंबईतील अनेक नाले कच-याने तुडंब भरून जात असल्याने पावसांत पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे दरवर्षीच्या पावसांत थोड्य़ा पावसांतही अनेक ठिकाणी पाणी तुंबते. नाल्यातील कचरा साफ केल्यानंतरही नागरिकांकडून पुन्हा कचरा फेकला जातो. त्यामुळे ही समस्य़ा कायम राहिली आहे. पालिका प्रशासनने यांवर उपायोजना करण्याचे ठरवले आहे. ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो, अशा नाल्याच्या ठिकाणी क्लिनअप मार्शल तैनात केले जाणार आहेत. कचरा फेकणा-यांवर या क्लिनअप मार्शलची नजर राहणार असून अशांवर कारवाई केली जाणार आहे. नाल्याच्या बाजूला असणारे बहुतांशी झोपडीधारक नाल्यात कचरा फेकतात, या कच-य़ांमध्ये प्लास्टिक पिशव्या व इतर न विरघळणा-या वस्तूंचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते. या निर्णयामुळे गटारे, नाल्यांत साचणा-या कच-यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पालिका प्रशाससनाला वाटते आहे. य़ाबाबत लवकरच निर्णय़ घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Post Bottom Ad