वीज ग्राहकांना बेस्टकडे आकर्षित करण्याचे काम टास्क फोर्सला - सुरेंद्रकुमार बागडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2018

वीज ग्राहकांना बेस्टकडे आकर्षित करण्याचे काम टास्क फोर्सला - सुरेंद्रकुमार बागडे

मुंबई - मुंबई शहरात बेस्ट उपक्रमाद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. सध्या बेस्टकडे व्यावसायिक व निवासी 10 लाख वीज ग्राहक आहेत. मात्र आता टाटा पॉवरही वीजपुरवठा करण्यास सज्ज झाली आहे. टाटाकडे जाणाऱ्या वीजग्राहकांना बेस्टकडे वळवण्याची जबाबदारी टास्क फोर्सवर सोपावण्यात आल्याची माहिती बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत दिली. 

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या शर्यतीत टाटा पॉवर उतरल्याने भविष्यात बेस्टच्या अडचणी वाढणार आहे. टाटा पॉवरकडून बेस्टचा विद्युत विभाग वीज खरेदी करत असला तरी बेस्टच्या हद्दीत टाटा पावरला शिरकाव करु देऊ नये, अशा सूचना सर्वपक्षीय सदस्यांनी केल्या. दरम्यान बेस्ट विद्युत विभागातील अधिकारी निवृत्तीनंतर टाटा पोवारमधील नोकरी करत आहेत. त्यांना बेस्ट उपक्रमाच्या कारभाराची सविस्तर माहिती आहे. दादर येथील विकासकाला इमारतीसाठी वीजेची गरज होती. त्याला 27 लाख रुपयांचे कोटेशन देण्यात आले. तो विकासक टाटा पावरकडे गेला असता त्याला 7 लाख रुपयात वीज देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र नंतर बेस्टनेही विकासकाला 7 लाख रुपयात वीज देण्याची तयारी दर्शवली त्यामुळे बेस्ट विद्युत विभागातील अधिकारी बेस्टला तोट्यात घालत आहे असा आरोप भाजपचे नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी केला. परिवहन विभाग तोट्यात असताना विद्युत विभागही तोट्यात जात असून याला जबाबदार कोण असा प्रश्न शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ यांनी केला. यावर टाटाकडे जाणाऱ्या वीजग्राहकांना बेस्टकडे वळवण्याची जबाबदारी टास्क फोर्सवर सोपावण्यात आली आहे. टास्कफोर्समधील अधिकारी पदाचा गैरवापर करत असल्यास त्यांची चौकशी करण्यात येईल असे बागडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad