मुंबईकरांना पाणीकपातीचे नो टेन्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2018

मुंबईकरांना पाणीकपातीचे नो टेन्शन


जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा - 
मुंबई - मुंबईकरांना अनेकवेळा पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. उन्हाळा सुरु झाला कि पाणी कपात लागू होणार कि काय अशी भीती मुंबईकरांमध्ये असते. मात्र यावर्षी मुंबईकरांना एक चान्गली बातमी आहे. मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी असल्याने यावर्षी मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट येणार नाही अशी माहिती संबंधित विभागाच्या एका अधिका-याने दिली.

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्याआधी ५ टक्क्यांपासून २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात करावी लागत आहे. मात्र यावर्षी उपलब्ध पाणीसाठा पुरेसा असल्यामुळे पाणीकपातीची गरज भासणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईला सध्या रोज ३८०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठा करणा-या सात तलावांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी ४ लाख ९० हजार एमएलडी इतका पाणीसाठा शिल्लक होता, तर यावर्षी ४ लाख ८० हजार एमएलडी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा अजून तीन महिने पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी पाणीकपात केली जाणार नाही. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सात धरणांव्यतिरिक्त गारगाई, दमणगंगा आणि पिंजाळ ही तीन धरणे बांधण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गारगाई धरणातून ४४० दशलक्ष लिटर, दमणगंगा धरणातून १८६५ दशलक्ष लिटर, पिंजाळ धरणातून १८६५ दशलक्ष लिटर असे एकूण ३१७० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. या प्रकल्पांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात १६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईला असा होतो पाणीपुरवठा --
मुंबईला वर्षभरासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. हे पाणी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या तलावांमधून पुरवठा केला जातो. मुंबईला दररोज ४५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून ३८०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाते. यामधील ३७५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईसाठी तर उर्वरित लिटर पाणी ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला पुरवले जाते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad