नवी दिल्ली - सौर ऊर्जेच्या वापरातून वीजेची गरज भागविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्थानक व रेल्वे इमारतींवर सोलर पॅनल बसविण्याचे नियोजन केले असून देशातील ४७८ रेल्वे स्थानक वर इमारतींवर सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३१ रेल्वे स्थानक व इमारतींवर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत.
सौर ऊर्जेच्या प्रभावी वापरासाठी रेल्वे मंत्रालयाने देशातील विविध रेल्वे स्थानकांवर ५०० मेगा वॅट वीज निर्मितीचे सोलर पॅनल लावण्याचे कार्य सुरु केले आहे. आतापर्यंत रेल्वेच्या देशभरातील विविध २१ विभागातील ४७८ रेल्वे स्थानक व रेल्वे इमारतींवर सोलर पॅनल लावण्यात आले असून महाराष्ट्रातील ३१ रेल्वे स्थानक व इमारतींचा यात समावेश आहे.
राज्यातील मध्य रेल्वेच्या एकूण १९ स्थानकांवर सोलर पॅनल बसविण्यात आली आहेत. यात कमन, नेरळ,टिकेकरवाडी, सांगोला, दौंड, खंडाळा, उंबेरमाळी, थानसिट, माथेरान, आसनगाव, पेण, भुसावळ, पुणे, राहुरी, पुणतांबा, अहमदनगर, केईएम, माटुंगा आणि खोपोली रेल्वे स्थानक व छत्रपती शिवाजी टर्मिनस ची एनेक्स इमारत, छत्रपती शिवाजी टर्मिनसची परळ येथील इमारतींचा समावेश आहे.
याशिवाय राज्यातील पश्चिम रेल्वे मार्गावरील जगजीवनराम हॉस्पिटल - मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांवर सोलर पॅनेल बसविण्यात आली आहेत. दक्षिण मध्य रेल्वेमार्गावरील उदगीर, धर्माबाद, उमरी, पूर्णा आणि परभणी व दक्षिण रेल्वेच्या परळी रेल्वे स्थानकावरही सोलर पॅनल बसविण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment