फॅशन स्ट्रीटवरील स्टॅालधारकांना पालिकेच्या नोटिसा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 April 2018

फॅशन स्ट्रीटवरील स्टॅालधारकांना पालिकेच्या नोटिसा


मुंबई । प्रतिनिधी - फॅशनेबल कपडे आणि वस्तू कमी किमतीत मिळण्यासाठीची जागा म्हणून फँशन स्ट्रीटची ओळख आहे. या फँशन स्ट्रीटवरील दुकानांवर पालिकेने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त स्टॉलसमोरील फूटपाथवरची जागाही अतिक्रमित करून तिथे व्यवसाय थाटणा-या सर्व ३९६ स्टॉलधारकांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे येथील व्यापा-यांची धावपळ उडाली आहे.

वारंवार सूचना देवूनही नियम धाब्यावर बसवून लोखंडी पाईप, लाकडी बांबू आणि ताडपत्रीच्या सहाय्याने अनधिकृतपणे अतिरिक्त वाढ करण्यात येत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. यामुळे फूटपाथ अडवला जावून लोकांना चालताना त्रास होत असल्याच्या असंख्य तक्रारीही पालिकेच्या ए वॉर्ड विभागाकडे आल्या होत्या. मागील वर्षीही ५० स्टॉलना नोटीसा काढल्या होत्या. त्यापैकी ३० जणांचे लायसन्सही रद्द करण्यात आले होते. परंतु उच्च न्य़ायालयाने यावर स्थगिती दिली आहे. मात्र याचा गैरफायदा घेवून पुन्हा अनधिकृतपणे स्टॉलमधील माल पुढे ठेवून फूटपाथ अडवला जात असल्याने ४८ तासांत अतिक्रमण न हटवल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

Post Bottom Ad