मुंबईती 98 टक्के बर्फ दूषित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2018

मुंबईती 98 टक्के बर्फ दूषित


14 हजार 700 किलो बर्फ नष्ट, 15 कारखान्यांवर कारवाई -
मुंबई - मुंबईत उन्हाळा सुरु झाला असून गरमी वाढत आहे. वाढत्या गरमीपासून दिलासा मिळण्यासाठी थंड शीतपेये व बर्फाचा गोळा खाण्याकडे मुंबईकरांचा कल असतो. मात्र मुंबईकर खात असलेला बर्फ आरोग्यासाठी घातक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 98 टक्के बर्फ खाण्यास दूषित असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी उन्हाळ्यादरम्यान बर्फाचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येते. मार्च महिन्यात महापलिकने मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणारे विक्रेते यांच्याकडून जमा केलेले बर्फ़ाचे 410 नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 400 नमुने खाण्यायोग्य नसल्याचे तसेच 352 नमुन्यामध्ये इ-कोलाय विषाणू असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार 98 टक्के बर्फ खाण्यास अयोग्य असल्याचे म्हटले आहे. दूषित बर्फामध्ये इ-कोलाय या शरीराला घातक असलेल्या विषाणूचे प्रमाण किती आहे, या दृष्टीने आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. या दूषित बर्फाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, जुलाब, संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिनाभरात 14 हजार 700 किलो बर्फ नष्ट करण्यात आला आहे, तर शहरातील बर्फ तयार करणाऱ्या 15 कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याचे केसकर यांनी सांगितले. दूषित बर्फ विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती केसकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad