मुंबई - प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर आता पालिकेने आपल्या उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मैदानात प्याऊ बांधले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील उद्यानांमध्ये नागरिक, वृद्ध फेरफटका मारण्यासाठी, विसावा घेण्यासाठी तसेच लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नासल्याने त्यांची गैरसोय होते. उद्यानात पाणी नसल्याने नागरिक पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन येतात. वापरल्यानंतर या बाटल्या उद्यानात मैदानात कुठेही फेकल्या जातात. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने अविघटनशील कचरा वाढतो. यामुळे पालिकेच्या हद्दीतील उद्याने मनोरंजन मैदानांमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्याऊ बांधण्यात यावेत अशी मागणी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी पालिकेकडे ठरावाच्या सुचेनद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना सभागृहाने मान्य केल्यावर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आली होती. आयुक्तांनी बहुतांश उद्याने मैदानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली असून आवश्यकतेनुसार इतर उद्याने, मैदानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल असे म्हटले आहे.
No comments:
Post a Comment