रस्ते अपघातांमध्ये १२ हजार जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2018

रस्ते अपघातांमध्ये १२ हजार जणांचा मृत्यू


मुंबई - रस्ते अपघात ही गंभीर समस्या बनली आहे. रस्ते अपघातांमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागत आहे. राज्यात ७४३ अशी ठिकाणे आहेत, जिथे अपघात घडतात. मुंबई शहरातील उपनगरांमध्ये त्यापैकी ५२ ठिकाणे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणांना ब्लॉक स्पॉट असे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विविध रस्ते अपघातांमध्ये १२ हजार जणांनी आपला जीव गमावला होता. अपघातासाठी जी विविध कारणे आहेत, त्यामध्ये वाढती वाहनांची संख्या हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.

राज्य सरकारतर्फे २३ एप्रिलपासून रस्ते सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी तीन सूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये नियमांची अंमलबजाणी, समुपदेशन आणि रस्त्यांचा दर्जा या घटकांचा समावेश आहे. वाहतूक पोलिसांनी चलन पद्धत राबवल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहतूकदारांना आळा बसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात अपघातप्रवण अशी ७४३ ठिकाणे आहेत. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये गंभीर स्वरूपाचे ३५ हजार ८५३ अपघात राज्यात झाले होते. तर २०१६ मध्ये ३९ हजार ८४८ अपघात झाले होते. म्हणजेच २०१७ मध्ये अपघाताचे प्रमाण हे १० टक्क्यांनी कमी झालेले दिसून येत आहे. २०१७ मध्ये १२ हजार २६४ प्रवासी, तर २०१६ मध्ये १२ हजार ८८३ प्रवाशांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad