मुंबई - महापलिकने ओला व सुका कचरा वर्गीकरण तसेच कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे गृहनिर्माण संस्थांना बंधनकारक केले आहे. काही संस्थांनी कचरा वर्गीकरण करणे सुरु केले आहे. त्यामुळे शास्त्रोक्त पध्दतीने कच-याची विल्हेवाट लावणा-या गृहनिर्माण संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.
मुंबईत कच-याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने विविध उपायय़ोजना सुरु केली आहे. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना कचरा वर्गीकरण करण्यासाठी महालिकेने सूचना करून त्याची अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने प्रयत्नही सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त पध्दतीने कच-याची विल्हेवाट लावण्याचे कामही काही गृहनिर्माण संस्थांनी सुरु केले आहे. ज्या संस्थांनी शास्त्रोक्त पध्दतीने कच-याची विल्हेवाट लावली आहे अशा गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. अशी सवलत दिल्यास ज्या संस्थांनी अद्याप कच-याची विल्हेवाट लावली नाही, अशा संस्थांना प्रोत्साहन मिळून तेही याबाबत सकारात्मक निर्णय़ घेतील असेही शेवाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच मुंबईतील कच-याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याबाबत अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्थांनी नवीन यंत्र खरेदीसाठी प्रस्ताव दिलेले आहेत. अशा मोठ्या गृहनिर्माण संस्थांना यंत्र खरेदी करण्याकरीता प्रोत्साहन मिळावे यासाठी खरेदी केलेल्य़ा यंत्रावरील जीएसटी कर माफ करावा अशी मागणीही शेवाळे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment