विनापरवाना, असुरक्षित पाणी विकल्याचे उघड -
मुंबई - प्रवासादरम्यान रस्त्यात येणारी हॉटेल, धाबे, दुकाने यामधून मिळणारे पदार्थ खाण्यावर व बाटली बंद पाणी पिण्यावर भर दिला जातो. मात्र याठिकाणी मिळणारे पदार्थ आणि पाणी लोकांच्या आरोग्याला घातक ठरू शकतात याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. असे असले तरी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने अन्न व औषधे प्रशासनाकडे जागरूक नागरिक म्हणून केलेल्या तक्रारींनंतर मेरमेड या पाण्याच्या बाटली बनवणाऱ्या कंपनीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगांवकर यांनी प्रवासादरम्यान सातारा येथील ढाब्यावर पिण्याच्या पाण्याची बाटलीची मागणी केली. त्यांना मेरमेड कंपनीची पाण्याची बाटली देण्यात आली. या पाण्याच्या बाटलीवर एसएसआय नंबर नव्हता तसेच पाणीही बरोबर नसल्याने पारगांवकर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दाखल घेत सह आयुक्त पुणे विभाग यांना आदेश देण्यात आले होते. मेरमेड पाणी बॉटल बनवणाऱ्या मे. शिल्पा बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड, नांदेड, तालुका हवेली जिल्हा पुणे यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणे परवाना नसल्याचे तसेच उत्पादित केलेले पाणी असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कंपनीकडे परवाना नसल्याने व विना परवाना केलेले उत्पादन असुरक्षित आढळल्याने संबंधितांवर पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयात खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर प्रकार निदर्शनास आणून कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यांना योग्य ते शासन होण्यासाठी बहुमोल सहकार्य केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने आनंद पारगांवकर यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment