मुंबई - राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून फेरीवाल्यांकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्यांचा परवानाच रद्द केला जाणार आहे. फेरीवाला धोरणात याचा समावेश केला समावेश केला जाणार आहे.
प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर पालिकेने अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अंतीम टप्प्यात आलेल्या फेरीवाला धोरणात कडक नियमांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषण आणी पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणा-या प्लास्टिकला आळा बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळापूर्वी फेरीवाला धोरण अंतीम करून परवान्याचे वाटप करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. फेरीवाल्यांनी प्लास्टिक पिशव्या वापरल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याचा कडक नियम केला जाणार आहे. पालिकेच्या 92 मंड्या आहेत. या मंड्या प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेने मागील काही महिन्यांपासून धोरण आखले आहे. अद्याप पालिकेच्या 23 मंड्या प्लास्टिकमुक्त झाल्या आहेत. मंड्यामध्ये कागदी व कापडी पिशव्या वापरण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच उर्वरित सर्व मंड्या प्लास्टिकमुक्त केल्या जाणार आहेत. त्यामुळे फेरीवाला धोरण अंतीम करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच त्यात प्लास्टिकबंदीबाबत नियमांचाही समावेश केला जाणार असल्याने प्लास्टिकला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment