दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी मंजूर - राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2018

दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी मंजूर - राजकुमार बडोले


मुंबई, दि. 3 - नागपूर येथील दीक्षाभूमीच्या विकास कामासाठी 100 कोटी तसेच अन्य ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वांच्या स्थळांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

दीक्षाभूमीसह कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र उभारणे, परळमध्ये संत रोहिदास भवन उभारणे आदी विविध कामांसाठीही राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीकरिता 100 कोटी रुपयांपैकी 2017-18 मध्ये 40 कोटी तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलसाठी 25 कोटी पैकी 15 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच परळ येथील संत रोहिदास भवन इमारत बांधकामासाठी 11 कोटी 12 लाख 51 हजार, ठाणे जिल्ह्यातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्या बांधकामासाठी 8 कोटी 1 लाख 70 हजार, स्वयंसेवी संस्थांना अनुदान म्हणून 2 कोटी 98 लाख इतक्या निधीस मान्यता देण्यात आली. दीक्षाभूमी, ड्रॅगन टेम्पल पॅलेस विकास कामासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीक्षाभूमीसह विविध ऐतिहासिक स्थळांच्या विकास कामासाठी मंजूर केलेल्या निधीमध्ये शासनाचा 90 टक्के तर संबंधित संस्थेचा 10 टक्के सहभाग असणार आहे, असेही बडोले यांनी सांगितले.

Post Bottom Ad