देवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्क १० टक्क्यांनी वाढणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 April 2018

देवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्क १० टक्क्यांनी वाढणार


मुंबई | प्रतिनिधी - मुंबईतील देवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानें घेतला आहे. तसेच बकरी ईदच्या दिवसात येथे आलेल्या शेळ्या, मेंढ्या, म्हैस, रेडे व म्हशींचे पाड्यांवर प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क बकरी ईद दरम्यान १५ दिवस शुल् घेतले जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

देवनार कत्तलखान्यात दरवर्षी सुमारे पावणे दोन ते दोन लाख शेळ्या, मेंढ्या बकरी ईद निमित्ताने आणल्या जातात. शेळ्यांना व बकऱ्यांना निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, साफसफाईची कामे, विद्यूत पुरवठा केला जातो. बकरी ईदपासून १५ दिवस व्यवस्था पार पाडली जाते. ही सुविधा पुरवताना महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा पडतो. ईद संणांपासून शेळ्या व मेंढ्यांच्या धार्मिक वधाकरता घरी घेऊन जाण्याकरता निशुल्क पास दिले जातात. त्यामुळे सन २०१४ पासून पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात एक ते दीड कोटींनी घट झाली आहे. २०१७ मध्ये बकरी ईदकरिता पालिकेने ६ कोटी ९० लाख ८४ हजार ३०३ इतका खर्च केला. मात्र, पालिकेला केवळ २ कोटी ३७ लाख ८४ हजार ६९६ महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा तोटा भरुन काढण्यासाठी पालिकेने ईद पूर्वीचे १२ दिवस, बकरी ईदचा दिवस आणि त्यानंतरचे २ दिवस असे १५ दिवस पशुवधगृहात विक्रीकरता आणल्या जाणाऱ्या शेळ्या, मेंढ्या तसेच म्हैस, रेडे, म्हशींचे पाडे याकरता प्रत्येकी १०० रुपये इतके प्रशासकीय तथा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. समितीच्या मंजुरीनंतर ही शुल्कवाढ लागू केली जाईल. मात्र, २०१९-२० पासून प्रतिवर्षी १० टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Post Bottom Ad