पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह तीन अधिकारी निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2018

पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह तीन अधिकारी निलंबित

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सी विभागात अनधिकृत बांधकाम होत असल्याचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात गाजला होता. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार अखेर महापालिकने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यात सहाय्यक आयुक्त जीवन घेघडमल यांचा समावेश आहे.

सी विभागामध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणात संबंधित सहाय्यक आयुक्त जीवन घेघ़डमल यांच्या सह डेजिग्नेशन अधिकारी व बीट अधिकारी यांनी हलगर्जीपणा करून दुर्लक्ष केल्याचे उघड झाले. याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर पालिकेने याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून या तिन्हीही अधिका-यांवर निलंबनाची कारवाई केली. या विभागाची जबाबदारी आता बी विभागाचे सहायक आयुक्त उदय कुमार शिरुरकर यांच्याकडे दिली आहे. पायधुनी येथील इस्माईल कार्टररोडवर नऊ मजल्याची अनधिकृतपणे इमारत उभी राहिली होती. अनधिकृत इमारत उभी राहीली असताना पालिकेच्या या अधिका-यांनी कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले. याबाबत विधी मंडळात आवाज उठवण्यात आला होता. सरकारने या अधिका-यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad