मुंबई - मुंबई महापालिकेकडून शहरातील कचरा रोज उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते. शहरातील कचरा वाहून नेण्यासाठी मार्च महिन्यात १ हजार ६७७ कोटींचे १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. आता तीन प्रभागांमधील कचरा वाहून नेण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने सोसायट्या व आस्थापनांना कचरा वर्गीकरण व विल्हेवाट लावण्याचे सक्तीचे केले आहे. मुंबईतील कचरा कमी होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. महापालिकेकडून शहरातील कचरा उचलण्यासाठी १ हजार ६७७ कोटींचे १२ प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव स्थायी समितीमध्ये राखून ठेवण्यात आले होते. त्यानंतर मात्र मार्च महिन्यात हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यावेळी स्थायी समितीत अंडरस्टॅण्डिंग झाल्याची चर्चा होती. यानंतर आता पुन्हा प्रशासनाने पश्चिम उपनगरातील आर मध्य आणि आर उत्तर या विभागातील कचरा लहान बंदिस्त वाहने, कॉम्पॅक्टर्स या वाहनांद्वारे वाहून नेण्यासाठी मे. ए. जी. एनव्हायरो या कंत्राटदाराला ७ वर्षांसाठी २८० कोटी रुपयांचे, 'टी 'प्रभागात याच स्वरूपाच्या कामासाठी मे. एम. डब्ल्यू. एच. डाया (संयुक्त भागीदार) या कंत्राटदाराला ७ वर्षांकरिता १२५ कोटी रुपयांचे तर 'आर दक्षिण' प्रभागातील कचरा उचलण्यासाठी ७ वर्षांसाठी मे.एम.डब्ल्यू. जी. (संयुक्त भागीदार) या कंत्रादाराला १८६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. स्थायी समितीत या अगोदरही असे प्रस्ताव राखून ठवून नंतर त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तीन प्रभागातील प्रस्तावावर स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment