मुंबई - मुंबई महापालिकेची सीएसटी येथील मुख्यालयाची इमारतीला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे. मुख्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीला जुलै २०१८ मध्ये १२५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या इमारतीची दुरुस्ती गेले कित्तेक वर्षे सुरु आहे. गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करूनही इमारतीच्या सुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने पुढील दोन वर्षांकरिता ३ कोटी रुपयांचे कंत्राट दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचा कारभार पालिकेच्या मुख्यालयातून हाकल जातो. मुख्यालयाच्या दोन इमारती आहेत. त्यातील एक १२५ वर्ष जुनी तर दुसरी ६ माजली इमारत आहे. ऐतिहासिक इमारतीमध्ये महापौर, उपमहापौर, आयुक्त, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समितींचे अध्यक्ष यांची कार्यालये तसेच सभागृह इत्यादी कार्यालये आहेत. तर नवीन इमारतीमध्ये राजकीय पक्ष, गटनेते, चार अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभाग प्रमुख यांची कार्यालये आहेत. पालिका मुख्यालयावर गेल्या कित्तेक वर्षात कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. मुख्यालयाच्या दुरुस्तीच्या कामावर पाण्यासारख खर्च होत असला तरी सुरुस्तीची कामे मात्र संथ गतीने सुरु आहेत. आता मुख्यालयाच्या इमारतीची रंगरंगोटी करणे, इमारतीच्या दगडांचे आवरण झिजणे, दगडांच्या खाचांमध्ये वनस्पतीची वाढ झाल्यास ती काढणे, नवीन भेगा पडल्यास डागडुजी करणे, दगडांवरील बुरशी हटवणे, दगडांमधील सांधे भरणे, भिंती शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ करणे, पावसाळ्यापूर्वी इमारतीच्या छताची मंगलोर कौलांची दुरुस्ती करणे इत्यादी कामांसाठी पालिका मे. देवांग कन्स्ट्रक्शन कंपनीची दोन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल २ कोटी ९१ लाख रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment