मुंबई - भांडूपमध्ये सार्वजनिक शौचालय खचून झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
भांडूपच्या शिवाजी तलावजवळील साईसदन चाळीतीळ सार्वजनिक शौचालयात एकूण २० शौचकुपे होती. शनिवारी पहाटे साडेसहा वाजता त्यातील १९ शौचालये खचली आणि ती मैला साठणाऱ्या टाकीत पडली. सुरुवातीला यात अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाने मदतकार्यास सुरुवात करून दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि पुरुषाचा समावेश असून बाबूलाल देवाशी, लाबूबेन जेठवा अशी त्यांची नावं आहेत.
No comments:
Post a Comment